Homehaveliप्रदीपदादा कंद युवा मंच पै किरण साकोरे मित्रपरिवार तर्फे महाआरोग्य शिबिर 

प्रदीपदादा कंद युवा मंच पै किरण साकोरे मित्रपरिवार तर्फे महाआरोग्य शिबिर 

प्रदीपदादा कंद युवा मंच पै किरण साकोरे मित्रपरिवार तर्फे महाआरोग्य शिबिर 

सुनील भंडारे पाटील 

लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये ज्येष्ठ नेते प्रदीप दादा कंद युवा मंच व किरण संपतराव साकोरे मित्र परिवारातर्फे भव्य अशा महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले,

सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत (गोल्डन पॅलेस) पेरणे टोल नाका जवळ आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये ब्लड शुगर, ईसीजी, मुतखडा मार्गदर्शन, ब्लड ग्रुप तपासणी, सर्वसाधारण तपासणी, ब्लड प्रेशर, पल्स रेट, हिमोग्लोबिन, मोफत डॉक्टरांचा सल्ला, इसीजी व हृदयासंबधीत सर्व आजारांची मोफत तपासणी, गुडघे पाठीच्या मणक्याचे विकार, तसेच सर्व हाडांचे आजार यांची सखोल तपासणी,

मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत नंबरचे चष्मा वाटप, त्याचप्रमाणे मुळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्ठता, हर्निया, पित्त तपासणी, मोफत औषध वाटप, करण्यात येणार असून यावेळी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे,

आरोग्य योजना शासकीय योजने अंतर्गत गरजू रुग्णांना एन्जोप्लास्टी, हृदयातील छिद्र, मुतखडा व प्रोटेस्ट ग्रंथी, ओल्व्ह रिप्लेसमेंट, हाडांचे फ्रॅक्चर, ओपन हार्ट सर्जरी, शस्त्रक्रिया करून मोफत उपचार करण्यात येणार आहेत,

गोल्डन पॅलेस पेरणे टोल नाक्याजवळ या महा शिबिराच्या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायत पासून बस व्यवस्था करण्यात आली असल्याचे पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!