Homepuneधक्कादायक....! जि प शाळा वाडा पुनर्वसन गावठाण वढू बुद्रुक मध्ये मुलगा जखमी...

धक्कादायक….! जि प शाळा वाडा पुनर्वसन गावठाण वढू बुद्रुक मध्ये मुलगा जखमी पालकांना समजेना काय झाले 

धक्कादायक….! जि प शाळा वाडा पुनर्वसन गावठाण वढू बुद्रुक मध्ये मुलगा जखमी पालकांना समजेना काय झाले 

सुनील भंडारे पाटील 

पुणे जिल्हा परिषद शाळेतील चिमुरड्या मुलांचा सुरक्षेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील जिल्हा परिषद वाडा पुनर्वसन शाळेमधील मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्याकडे शाळेतील शिक्षकांनी पूर्णपणे दुर्लक्ष करत उपचार तर सोडाच पालकांना देखील याची माहिती दिली नाही,

संबंधित शाळा ही वढू बुद्रुक ते सणसवाडी ला जाणाऱ्या रस्त्यालगत चासकमान वाडा पुनर्वसन गावठाण मध्ये असून या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिले जाते,

पहिली ते चौथी म्हणजे शाळेत शिकणारी अतिशय लहान मुले आहेत, शिवांश राम कोतकर इयत्ता दुसरीत शिकणारा हा मुलगा , आपण जर छायाचित्रात पाहिले तर या मुलाच्या कपाळावर किती गंभीर जखम झाली आहे, ही जखम आज कशामुळे झाली, याची माहिती नाही शिवाय त्याला वैद्यकीय उपचार देखील मिळाला नाही,

शाळा सुटल्यानंतर या मुलाचे पालक त्याला शाळेत आणण्यासाठी गेले असता एकटा मुलगा वर्गात बसलेला होता, याबाबत शिक्षकांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली, पालकांनी त्या मुलाला उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले,

एकंदरीत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड्यापाड्यामध्ये मुलांच्या जीवाशी खेळते काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, संबंधित मुलाची प्रकृती पाहता परिसरातून संताप व्यक्त होत आहे, संबंधित शाळेतील शिक्षकांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!