दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी आळंदी
येथील नर्मदा परिक्रमा परिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या शुभ संकल्पनेने व सद्गुरु राजाराम महाराज शास्त्री झेंडूजी महाराज परंपरा कृपेने छत्रपती शाहू महाराज सभागृह कोल्हापूर येथे राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील राष्ट्रीय कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार असून ते भजन, काकडा, गायन, मृदंग वादनाचे माध्यमातून वारकरी संप्रदायात गेल्या ४० वर्षापासून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी शेकडो प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासत कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यात त्यांचा सिंहाचा वाटा योगदान आहे. दिलीप महाराज ठाकरे आळंदी पंचक्रोशीत नव्हे तर राज्यांमध्ये कीर्तनकार म्हणून परिचित आहेत सामाजिक भान जपणाऱ्या या महाराष्ट्राची संस्कृती आणि धार्मिक परंपरा लोकांमध्ये रुजवून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाविषयी प्रबोधनाचे केलेले कार्य या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना राज्यस्तरीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार 2025 प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.
आळंदी जनहित फाउंडेशनचे मार्गदर्शक असून त्यांना पुरस्कार मिळाल्याने आळंदीचे वैभवात वाढ झाली आहे. आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी फाउंडेशन तर्फे त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


