Homecrimeसंतोष वारघडे यांचे बकोरी ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र,रामराव कुटे यांच्या न्यायालयीन लढ्याला...

संतोष वारघडे यांचे बकोरी ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र,रामराव कुटे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

संतोष वारघडे यांचे बकोरी ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र ,रामराव कुटे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

सुनील भंडारे पाटील
बकोरी तालुका हवेली येथे २०२०~२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष रानबा वारघडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते, त्याप्रसंगी त्यांना दोन अपत्ये होती त्यानंतर साधारणपणे काही काळानंतर त्यांना पुन्हा एक अपत्य झाले,
त्यामुळे तीन अपत्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु त्यांनी तसे न करता ग्रामपंचायत सदस्य पदाचा सर्व कार्यकाळ जवळपास पूर्ण करून शासन नियमांची पायमल्ली केली असल्याचे प्रतिपादन बकोरी येथील दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामराव कुटे यांनी जिल्हाधिकारी यांना केलेल्या अर्जामध्ये म्हटले होते,
संतोष वारघडे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी पुणे यांच्या न्यायालया मध्ये विवाद अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व पुरावे आणि कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर संतोष वारघडे यांचे सदस्य पद जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन्ही बाजूंचा विवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४(१) (ज~१) च्या आधारे १४ नोव्हेंबर २०२५ रोजी अपात्र ठरवून संतोष वारघडे यांचे सदस्य पद रद्द केलेल्या आदेशाची प्रत पंचायत समिती हवेली,लोणी काळभोर कार्यालय , जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायत बकोरी यांना देण्यात आली आहे. फिर्यादीच्या बाजूने ॲड शेख यांनी कामकाज पाहिले,
शासन नियमानुसार सन २००१ पासून तीन अपत्य असलेल्या व्यक्तीला कोणतीही निवडणूक किंवा कोणतेही राजकीय पद भोगता येत नाही संतोष रानबा वारघडे यांना बकोरीचे ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर एक अपत्य झाले होते त्यामुळे त्यांनी तीन अपत्य असल्यामुळे नैतिक जबाबदारी ओळखून पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु त्यांनी तसे न करता शासनाची फसवणूक करून शासन नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात शासनाने योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
रामराव कुटे मा. चेअरमन दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटी बकोरी
Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!