Homehaveliपुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या सचिव पदी जयसिंग भंडारे

पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या सचिव पदी जयसिंग भंडारे

पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या सचिव पदी जयसिंग भंडारे

सुनील भंडारे पाटील

पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या सचिव पदी श्री क्षेत्र वढु बुद्रुकचे जयसिंग दिलीपराव भंडारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली, दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली,

या नियुक्तीनंतर श्रीक्षेत्र वढू बुद्रुक चे पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील संघटनेची व्याप्ती वाढवून, पोलीस पाटलांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहे, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलीस पाटलांच्या समस्या सोडवून समाज तसेच पोलीस खात्यात चांगल्या प्रकारचा समन्वय साधण्याकडे कल ठेवणार आहे,

यावेळी दौंड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राहुल दादा कुल, महाराष्ट्र राज्याचे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश शेंडगे पाटील ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव राळे पाटील व पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!