Homepuneब्रेकिंग..! सिद्धिविनायक नगर मलठण फाटा येथिल भंगाराच्या दुकानाला भिषण आग

ब्रेकिंग..! सिद्धिविनायक नगर मलठण फाटा येथिल भंगाराच्या दुकानाला भिषण आग

ब्रेकिंग..! सिद्धिविनायक नगर मलठण फाटा येथिल भंगाराच्या दुकानाला भिषण आग

शिक्रापूर प्रतिनिधी

शिक्रापूर (शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात असलेल्या भंगाराच्या दुकानाला आज सकाळीं 11 च्या सुमारास भिषण आग लागली या आगीने रौद्र रूप धारण करीत शेजारी असलेल्या पत्र्याच्या कंपनी सुध्दा आगीच्या विळख्यात सापडली ,

या घटनेची माहिती मिळताच स्थानीक नागरिकांनी वेळेत अग्निशमन दलाला माहिती दिली असता अग्निशामक दल घटना स्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली,

या आगी मध्ये भंगाराचे दुकान पुर्ण पणे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडचे सुध्धा नुकसान झाले.

काही अंतरावरच समोर सी एस भुजबळ इंग्लिश स्कूल असुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शाळा व्यवस्थापनाने शाळेतील विद्यार्थ्यांना त्वरित शाळेला सुट्टी देउन सर्व मुलांना सुखरूप घरी पोहोचविले, आग आटोक्यात आली असुन आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!