शिक्रापुर येथे विजेचा लपंडाव सुरू
शिक्रापूर प्रतिनिधी
पंचक्रोशीत नावाजलेले गाव अशी शिक्रापूर (तालुका शिरूर) गावची ओळख आहे परंतु याच शिक्रापूर मध्ये सध्या विजेची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे , रात्री बेरात्री विज जाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे, मागील महिन्या भरापासून हा वीजेचा लपंडाव सुरू आहे ,
सध्या जिल्ल्हा परिषद परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी चे वारे वाहत असुन इच्छुकांनी वीज पाणी रस्ते या मूलभूत गरजेवर लक्ष दिल्यास नक्कीच शिक्रापूरकर जनता सुध्दा येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच या समस्यांवर काम करणाऱ्या उमेदवाराचा विचार करेल यात तीळ मात्र शंका नाही.
इच्छुकांनी देवदर्शन वारी किंवा आणखी काही प्रलोभने दाखविण्यापेक्षा मतदार संघातील समस्येवर उपाय करावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे,
शिक्रापूर गावची रहदारी / लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, बहुतांश गुन्हे हे रात्रीच्या वेळी घहोत असून रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गुन्हेगारीला वाव मिळत आहे, त्यामुळे शिक्रापूर गावचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत,
या समस्येचा लढा ग्रामस्थांना द्यावा लागत आहे लोकनेते मात्र या समस्येकडे फक्त आ वासून पाहत आहेत, आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांची रेस लागली आहे , मात्र गावची समस्या म्हणजे ग्रामस्थांची समस्या आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही अशी भूमिका लोकनेतेची आहे,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


