केंदुर पाबळ जिल्हा परिषद गटात प्रफुल्ल शिवले यांची सहावी उज्जैन यात्रा उत्साहात संपन्न एकवीस हजार लोकांनी घेतले उज्जैन श्री महाकालेश्वरचे दर्शन
सुनील भंडारे पाटील
आगामी जिल्हा परिषद निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात प्रफुल्ल शिवले यांची जोरदार तयारी चालू असून नुकतीच त्यांची सहावी उज्जैन श्री महाकालेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली,
या भागात कायम राजकीय दबदबा असणारे प्रफुल्ल शिवले यांनी उज्जैन यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील सुमारे 21 हजार लोकांना श्री महाकालेश्वरचे दर्शन घडवले आहे, यात्रेच्या निमित्ताने पहिल्या ट्रेन पासून ते सहाव्या ट्रेन पर्यंत लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता,
केंदुर पाबळ जिल्हा परिषद गटातील धामारी, जातेगाव, मुखई, पाबळ, केंदुर, करंदी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वढू बुद्रुक, खैरेनगर, या गावांमधील ग्रामस्थांनी व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेऊन श्री महाकालेश्वराचे दर्शन घेतले, प्रफुल्ल शिवले त्यांच्या या कार्याबद्दल लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


