Homehaveliपूर्व हवेलीपट्ट्यात अवैध प्लॉटिंग व्यवसायिकांचा धुमाकूळ-ऐन सणासुदीत खरेदीदाराची फसवणूक होण्याची शक्यता

पूर्व हवेलीपट्ट्यात अवैध प्लॉटिंग व्यवसायिकांचा धुमाकूळ-ऐन सणासुदीत खरेदीदाराची फसवणूक होण्याची शक्यता

पूर्व हवेलीपट्ट्यात अवैध प्लॉटिंग व्यवसायिकांचा धुमाकूळ-ऐन सणासुदीत खरेदीदाराची फसवणूक होण्याची शक्यता

सुनील भंडारे पाटील

सध्या राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा असताना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या पूर्वपट्यात अवैध प्लॉटिंग व्यवसायिकांनी धुमाकूळ घातला असून बेकायदा चाललेल्या प्लॉट खरेदी विक्री मधून प्लॉट खरीदाराची फसवणूक होण्याची शक्यता आहे,

शासनाच्या नियमानुसार शेती क्षेत्रामध्ये प्लॉटिंग व्यवसायासाठी बंदी आहे, असे असताना हवेली तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये बागायत तसे जिरतशेती मध्ये प्लॉटिंग व्यवसाय बंदी आहे, जिरायत शेतीसाठी 20 गुंठे, तर बागायत शेतीसाठी 10 गुंठे, अशी मर्यादा असताना प्लॉटिंग व्यावसायिकाकडून राजरोसपणे नियम तोडून गुंठ्यांची विक्री केली जात आहे,

मग अशा विकत घेतलेल्या प्लॉटला स्वतःचा हक्काचा रस्ता,पाण्याची सोय, गटार लाईन, सार्वजनिक लाईट, ग्रामपंचायतच्या सर्व सोयी सुविधा आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुकडा बंदी कायदा असताना 1 गुंठ्याची खरेदी विक्री कशी केली, त्यामुळे भविष्यात खरेदीदाराची ऐन दिवाळीच्या सणांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे,

अवैध प्लॉटिंग व्यवसाय पासून होणारी जनतेची तसेच शासनाची फसवणूक थांबवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी “अवैध प्लॉटिंगला बंदी” असा ठराव ग्रामसभेत करून तशी गावामध्ये नोटीस फलक लावणे गरजेचे आहे, शिवाय या ठरावाची प्रत तलाठी व मंडलअधिकारी यांना माहितीसाठी सादर करावी,

 

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!