Homecrimeलग्नाकरिता मुली असल्याची बतावणी करून फसवणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी केला पर्दा फाश

लग्नाकरिता मुली असल्याची बतावणी करून फसवणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी केला पर्दा फाश

लग्नाकरिता मुली असल्याची बतावणी करून फसवणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी केला पर्दा फाश

सुनील भंडारे पाटील

“लग्नाकरिता मुली असल्याची बतावणी करुन मुलीचे बनावट बायोडाटा व फोटो पाठवुन लग्नासाठी रजिस्ट्ेशन व कोर्ट मँरेज संदर्भाचे कागदपत्रे बनविण्यावे नावाखाली पैसे लुबडणान्या टोळीचा शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केला पर्दाफाश ”

या कारवाईमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून ५ महीला ताब्यात घेण्यात आले आहेत, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार शिक्रापुर पोलीस स्टेशन, जि. पुणे ग्रामीण येथे दिनांक २९/०६/ २०२५ रोजी. नारायण सत्यवान शिरोडकर,. वय ५६ वर्षे, व्यवसाय शेती, रा. तळगाव सुकळवाड, ता. मालवण, जिल्हा सिंधुदर्ग यांनी हजर राहुन ” दिनांक १९/0५/ २०२५ रोजीपासुन ते दिनांक २५/०६/२०२५ रोजीकालावधीत ते त्यांचा भाचा शिवहरी यशवंत लेले याचे लग्नासाठी मुलगी शोधत असताना फोन नंबर ७९०७१८९७१३ व फोन नंबर ९०६७७९१०४३ यावरून त्यांचे फोनवर फोन करुन एका महीलेने त्यांना खतःवे नाव – संगिता भोसले असे सांगुन “” आंम्ही मौजे वदु बुदुक, ता. शिरूर, जि. पुणे येथील माहेर संस्थेमधील अनाथ मुलीवे लम्न लावुन देतो “ असे सांगुन त्या मोबादल्यात त्यांचेकडुन दिनांक २०/०५/२०२५ रोजी एस.बी.आय.बॅक कुडाळ, जि. सिंधुर्ग या शाखेतील खाते नंबर ४३०३१९५२९४३ यावरुन आरोपीने पाठविलेल्या स्कॅनखर ७,000|- रू. ऑनेलाईन रक्कम व दिनांक २०/०६ / २०२५ रोजी त्यांचा भाचा शिवहरी यशवंत लेले याने गावातील मनी ट्रान्सफर करणारा त्याचा मित्र अभिषेक वायगणकर याचे फोन पे अकाऊंट वरुून आरोपीने पाठविलेल्या स्कॅनरवर १२.000|- रू. असे एकुण १९,000/- रू. ऑनलाईन रक्कम पाठविले असता सदर महीलेने त्यांचे मोबाईल फोनवर माहेर संस्थेत पैसे भरल्याच्या बनावट पावत्या व ” माहेर अनाथ आश्रम सहमती पत्र दाखवुन व पाठविले परंतु प्रत्यक्षात सदरची महीला व तिने पाठविलेल्या पावत्या हया बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन, जि.पुणे ग्रामीण येथे गु.रजि.नं. ४२२|२०२५ बी.एन.एस.कलम ३१९(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(२ ),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , व शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पो.हवा.२५६९ महेंद्र पाटील, पो.हवा. २४७२ उध्दव भालेराव व म.पो.अं. रूपाली निंभोरे ब नं२३१० यांचे तपास पथक तयार करून व त्यांना योग्य ते मार्गद्शन करून चंद्रपूर जिल्ह्यातून सदर गुन्हा केलेल्या आरोपी महीला नामे – १)सपना भाउराव पोडे, वय २६ वर्षे, रा.विसापुर, ता. बल्लारशाह, जि. चंद्पुर, २) प्रेयंका नितेश जांगळे, वय ३३ वर्षे, रा.पंचशिल चौक, दुर्गापुर, जि. चंद्पुर, ३) भुमीका युरेश सौंदरकर, वय २४ वर्षे, रा. सुमित्रानगय, तुकम, जि. चंद्रपुर, ४) प्रांजली सुभाष सुखदेवे, वय २० रा. सालोरी, येन्सा ब्लॉक, पोस्ट विनोरा, ता. वरोरा, जि चंद्रपूर व ५९) आचल आशिष बोरेवाय, वय २५ वर्षे, रा.हनुमान नगर, तुकुम, जि.चंदरपुर यांना ताब्यात धेवुन ,

त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने सदर महीलांना सदर गृन्हयाचे तपासी अंमलदार पो.हवा./ २५९६९ महेंद्र पाटील यांनी दिनांक ११|१०/ २०२५ रोजी अटक केली आहे

सदर गुन्हयातील अटक महीलांची मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर न्यायालय, शिरूर यांनी 0३ दिवसांची पोलीस कोठडीची रिमांड मंजुर केलेली आहे कोणाची लग्नकारिता मुली असल्याची बतावणी करुन मुलींचे बायोडाटा व फोटो पाठवुन लग्नासाठी रजिस्ट्रेशन व कोर्ट मॅरेजचे कागदपत्रे बनविन्याचे नावाखाली पैसे लुबाडुन फसवपुक झाली असल्यास अश्या लोकांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे संपर्क साधन्या बाबत शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचेकडुन जाहीर आवाहन करण्यात येत आहे,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!