Homecrimeमित्राचा दगडाने ठेचुन निर्घृण खून करणारे सराईत ३आरोपी अवघ्या ३० तासात जेरबंद

मित्राचा दगडाने ठेचुन निर्घृण खून करणारे सराईत ३आरोपी अवघ्या ३० तासात जेरबंद

“वाघोली पोलीस स्टेशन पणे शहर, तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी मीत्राचा दगडाने ठेचुन निर्घृण खून करणारे सराईत तीन आरोपी अवघ्या ३० तासात जेरबंद’

सुनील भंडारे पाटील

दि ०५/१०/२०२५ रोजी पहाटेचे ०४/५ वाजण्याचे सुमारास अक्षय पटेल, मयुर वडमारे प्रदीप जाधव, बादल शेख सर्व राहणार खराडी पुणे असे मित्र-मित्र कृष्णा लॉज. उबाळेनगर, वाघोली पुणे ठिकाणी येवुन लॉजचे पार्कींग मध्ये गप्पा मारीत असताना त्यांचे मध्ये बाचाबाची होवुन,

अक्षय पटेल, मयुर वडमारे व प्रदीप जाधव यांनी संगनमत करुन बादल शेख यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी हत्त्याराने व दगडांनी डोक्यात मारुन खून केला ,

म्हणून गु.र.नं ५४७/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १0३, १५(२), ३५२. ३(५). महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(9) (३) सह १३५ व भारतीय हत्यार ‘कायदा ‘कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध तपास पथक अधिकारी व अंमलदार हे घेत असताना’

पोहवा प्रदिप मोटे यांना’ खराडी, दापोडी, पुणे येथे आरोपी असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाले वरुन सदर ठिकाणी सापळा रचून दाखल गुन्हयातील आरोपी नामे १)अक्षय बाबु पटेल वय २४ वर्षे, रा.लेन नं १३ आपलेघर ‘सोसायटी, खराडी, पुणे २)मयुर रामकिसन वडमारे वय २२ वर्षे. रा. खुळेवाडी चंदननगर, पुणे ३)प्रदीप रघुनाथ जाधव वय २३ वर्षे, रा.लेन नं८ आपलेघर सोसायटी, खराडी, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.. अधिक तपास पोलीस निरिक्षका(गुन्हे) आसाराम शेटे करित आहेत,

सदरची कामगीरी अमितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर,रंजनकुमार शर्मा सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर सोमय मुंडे पोलीस उप आयुक्त परीमंडळ इ. पुणे शहर, प्ांजली सोनवणे सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज हांडे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, आसाराम शेटे पोलीस निरीक्षक (गुन्हे). वाघोली पोलीस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि।मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे. मंगेश जाधव. सुनिल कुसाळकर, समीर भोरडे. पांडुरंग माने, विशाल गायकवाड. दिपक कोकरे, साईनाथ रोकडे. प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!