Homecrimeलोणी काळभोर पोलीसांनी गांजासह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

लोणी काळभोर पोलीसांनी गांजासह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

लोणी काळभोर पोलीसांनी गांजासह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

लोणी लोणी काळभोर पोलीसांनी पकडला तब्बल १२.५ किलो गांजा, गांजा वाहुन नेणारी रिक्षा व गांजासह एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

लोणी काळभोर प्रतिनिधी 

दि. २१/०९/२०२५ रोजी दोन इसम उरुळी कांचन कडुन निगडीकडे जात असुन सदर रिक्षामध्ये मोठ्याप्रमाणात गांजा असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई राहुल कर्डीले यांना मिळाली .

त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना माहिती सांगितली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांचे एक स्वतंत्र पथक तयार करुन त्या पथकास सापळा रचुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी सांगितले .त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी रिक्षा येणाऱ्या मार्गावर सापळा रचुन संशयीत रिक्षांवर पाळत ठेवली.

दि. २१/०९/२०२५ रोजी सकाळी ०९/१५ वाजण्याच्या सुमारास थेऊर रेल्वे पुला शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर येथे संशयीत रिक्षा दिसताच लोणी काळभोर पोलीसांनी रिक्षा व रिक्षा चालकास ताब्यात घेतले. या रिक्षाची पोलीसांनी तपासणी केली असता रिक्षामध्ये रिक्षाचालक लक्ष्मण राजु पवार (वय ३० वर्षे, रा. यमुना नगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम निगडी, पुणे )याने त्याचा साथीदार रवि आण्णा कु-हाडे ( रा. यमुना नगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोरडपट्टी, ओटा स्किम निगडी, पुणे )याच्यासह सुमारे २,४०,०००/-रु किं. चा १२ किलो ३४५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला .

हा गांजा ते त्यांचे ताब्यातील रिक्षा नं. एम एच १४ एल एस ३१४६ मधुन घेवुन जात असताना मिळुन आल्याने सदर रिक्षा देखील जप्त करण्यात आली आहे. असा एकुण सुमारे ५,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल लोणी काळभोर पोलीसांनी जप्त केला आहे. या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वरिल दोन इसम व एका अज्ञात इसमाविरुच्य गु. र. नं. ४२४/२०२५, एन.डी.पि.एस. अँक्ट ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलीसांना या गुन्हयातील आरोपी तसेच रिक्षा नंबर अथवा इतर कोणतीही खात्रीशिर माहिती नसताना देखील, त्यांनी अतिशय कौशल्यपूर्णरित्या संशयीत रिक्षा व रिक्षा चालकास ताब्यात घेवुन त्याच्या कडुन सुमारे १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

ही उत्कृष्ठ कागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,पोलीस शिपाई राहुल कर्डीले यांनी केली आहे.

अवैध धंद्यावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!