HomeUncategorizedभाडघर धरण(भोर) परिसरात चांगला पाऊस नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भाडघर धरण(भोर) परिसरात चांगला पाऊस नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भोर प्रतिनिधी सुनिल साळवी
                  भोर तालुक्यातील भाडघर धरण परिसरात पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस मुसळधार पाऊस होत असल्यामुळे भाडघर धरण जवळपास पूर्ण भरले आहे.आज दि. ३१-०७-२०२४ रोजी भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून संध्याकाळी ६:०० वा. धरण ९४.२६ % भरले आहे. त्यामुळे धरणामध्ये सुरू असणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता ठीक संध्याकाळी ८:०० वाजता भाटघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्र द्वारे नदीपात्रामध्ये १७५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

तरी सर्वांना पाटबंधारे विभाग पुणे यांच्यावतीने विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!