Homeacb5 लाखांची लाच मागणी प्रकरणी वाघोली पोलीस चौकीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अँटी...

5 लाखांची लाच मागणी प्रकरणी वाघोली पोलीस चौकीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अँटी करप्शन च्या जाळ्यात

सुनील भंडारे पाटील 
                वाघोली (तालुका हवेली) येथील पोलीस चौकीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक याने पाच लाखांची मागणी केल्या प्रकरणी पुणे लाच लुचपत विभागाने पडताळणी करून गुन्हा दाखल केला असून हा पोलीस सहाय्यक निरीक्षक अँटीकरप्शन जाळ्यात सापडला आहे,

                याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 746/2024 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये आरोपी लोकसेवक चेतन चंद्रकांत थोरबोले वय 36 वर्ष पद सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस चौकी, लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर वर्ग 2, यावर लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 

                 यातील तक्रारदार यांचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दाखल होता सदर अर्ज चौकशीकामी थोरबोले याचे कडे होता, या अर्जाचा नील अहवाल पाठवण्यासाठी तसेच तक्रारदार यांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून लोकसेवक थोरबोले याने तक्रारदाराकडे 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, या तक्रारीची पंचां समक्ष पडताळणी केली असता थोरबोले याने 5 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी आणती 1 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 
                    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधुरी भोसले, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, पोलीस शिपाई नीना कोळपे, वाहन चालक अविनाश चव्हाण, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे,
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!