पुणे जिल्हा प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षा पासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक
स्काऊट व गाईड गणवेश – मंगळवार, गुरूवार व शनिवार रोजी गडदनिळ्या रंगाचा ओव्हर ऑल फ्रॉक
इयत्ता ५ वी मुली
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी मुली आणि इयत्ता १ ली ते इयत्ता ८वी मुली ऊर्दू माध्यम
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी
आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी
स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार रोजी
गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी
इयत्ता १ली ते इयत्ता ७वी मुले-
नियमित गणवेश – सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट
स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
इयत्ता८वी मुले
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट
स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार रोजी
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पैट


