सुनील भंडारे पाटील
राजगुरुनगर पुणे येथून पैठण ला जाणाऱ्या एसटी बसने रस्ता क्रॉस करणाऱ्या अनोखी व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला,
एसटी बसचा चालक राजेंद्र अर्जुन भुसारी, वय-40 वर्ष , एसटी बस गाडी नंबर-MH-14 BT-4667 राजगुरू पुणे पैठण जाणारी एसटी बस आज रविवार तारीख 23 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली असून अपघात ग्रस्त व्यक्तीस खाजगी ॲम्बुलन्सने पुढील उपचार करण्यासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे रवाना केले, परंतु त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले,
संबंधित अज्ञात व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून, या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
मृत व्यक्तीचे वर्णन-साधारणता 40 ते 45 वय लिंग पुरुष, अंगावर पिवळ्या काळा पट्टा असलेला शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट अशा वर्णनाच्या व्यक्तीची ओळख कोणाची असल्यास तातडीने लोणीकंद पोलीस स्टेशनचे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,
अपघातानंतर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती, ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने तातडीने हालचाली करून, अपघात ग्रस्त व्यक्ती ॲम्बुलन्सच्या सहाय्याने ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली, त्याचप्रमाणे रस्त्यावर पडलेले रक्त यावर माती टाकण्यात आली तसेच पानि ट्याकरच्या साह्याने स्वच्छ करण्यात आले अशी माहिती वाहतूक पोलीस हवालदार जितेंद्र पवार ,पोलीस शिपाई स्वप्निल गालफाडे यांनी दिली,
रस्ता दुभाजकाच्या मधोमध सेफ्टी बेरीगेट नसल्याने असे अपघात घडतात तसेच अनेकांना आपले जीव गमावा लागतो याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष आहे, वाघोली मधील क्रोमा शोरूम च्या समोर रस्ता दुभाजकामध्ये सेफ्टी ब्रिगेड बसवावे अशी मागणी ग्रामस्था व नागरिकांनी केली आहे,


