पुणे जिल्हा प्रतिनिधी
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सगेसोयरेचा अध्यादेश पारित व्हावा म्हणून आंतरवाली सराटी (जालना) येथे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.तरी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज माढा यांच्यावतीने आज रोजी आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेत तेथील असणारे आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे यांनी आपला मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा आहे म्हणून पाठिंब्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले.
तसेच या पत्रामध्ये आमदार बबनराव शिंदे यांनी म्हटले आहे की, मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणाविना वंचितच आहे तसेच मराठा समाजातील तरुण-तरुणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना हा करावा लागत आहे तसेच मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता,समान न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ठोस अशी पावले उचलून मराठा समाजास टिकाऊ आरक्षण देण्यात यावे.
तसेच मराठा समाज बांधवांना ओबीसी मध्ये कुणबी मराठा पितृसत्ताक व मातृसत्ताक सगेसोयरे या शब्दांचा अंतर्भाव करून लाभ मिळण्यासाठी मराठा समाज आरक्षणाचे जनक श्री. मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणास मी माढा तालुका तसेच माढा विधानसभा मतदार संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे.
तसेच सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व आमदार, खासदार यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र काढावे तसेच राज्य सरकारला आपले पाठिंब्याचे पत्र द्यावे असे जाहीर आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
106