बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव; बजरंग सोनवणे तब्बल सात हजार मतांनी विजयी
बीड लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत होती. मनोज जरांगे पाटील फॅक्टरमुळे बीड लोकसभा निवडणूक चुरशीची बनली असे मानले जात होते. त्यामुळेच सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या फेरीत पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली. शेवटपर्यंत दोन्ही उमेदवार आघाडी आणि पिछाडीवर जात होते. अखेर राज्यात सर्वात शेवटी बीडचा निकाल जाहीर झाला आणि बजरंग सोनवणे विजयी झाले.


