HomeUncategorizedबडेबाप की बिगडी औलाद मदयप्राशन करून दुचाकी वरील दोघांना उडवले दोघेही जागेवरच...

बडेबाप की बिगडी औलाद मदयप्राशन करून दुचाकी वरील दोघांना उडवले दोघेही जागेवरच गतप्राण

पुणे जिल्हा प्रतिनिधी
             १८ मे रोजी रात्री पुणे येथील कल्याणी नगर परिसरा मधील एका वेगवान पोर्श कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानंतर. दुचाकी चालकाचा तोल गेल्याने तो अनेक मीटर अंतर पर्यंत गाडी सहीत ओढत गेल्यामुळे. तसेच भीषण अपघातात दुचाकीस्वार व त्याच्या बरोबरील एक जनाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे शहर डीसीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे.आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत. डीसीपींनी सांगितले आहे की, आरोपींवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.

         सदरील घटनेची माहिती पुणे पोलिसांना पहाटे तीनच्या सुमारास मिळाल्यानंतर पुणे बुलर पब जवळ झालेल्या अपघाताची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली आसून,पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या की रात्री १ वाजेनंतर सर्व बार, पब, रेस्टॉरंट आणि रूफ टॉप हॉटेल बंद होतील.प्रकरणी पुणे पोलिसांनी पोर्श कारच्या अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले असून तो रिअल इस्टेट डेव्हलपर चा मुलगा आहे. पुणे शहर पोलिस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी सांगितले आहे की, आम्ही अल्पवयीन व्यक्तीला मद्य प्राशन केले होते की नाही हे शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे तसेच त्याची तपासणी करून त्याच्या वरती कडक कारवाई करण्यात येईल .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!