सिक्युरिटीच्या वादातून शेवाळेवाडीत भरदिवसा गोळीबार झाल्याने शेवाळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. सोसायटी सिक्युरिटी कामगार पळविण्याच्या वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकात बाचाबाची झाल्याने रागाच्या भारात गोळीबार करण्यात आला. यामध्ये ठेकेदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एक माजी सैनिक आरोपींस अटक केली आहे.सकाळी अचानक गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख हडपसर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.हडपसर पोलिस स्टेशन गुन्हे पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी दोघेही माजी सैनिक असून दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शेवाळवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला. दोघांत बाचाबाची झाल्याने गोळीबार करण्यात आला. सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये या अगोदर दामोदर विहार येथे वाद झाला.


