Homejunnarअवैध्यरित्या गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशनची कारवाई

अवैध्यरित्या गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशनची कारवाई

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध्यरित्या गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशनची कारवाई ….4,80,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त 

जुन्नर प्रतिनिधी
                दिनांक 04/04/2024 रोजी पहाटे 03.30 वा. चे सुमारास मौजे नारायणगांव (ता.जुन्नर) जि. पुणे गावचे हद्दीत आळेफाटा कढून नारायणगांव च्या दिशेने एक महिंद्रा पिकअप गाडी गोमांस घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर रवींद्र चौधर यांना मिळाली होती,

          त्यांनी दिलेल्या सूचने नुसार नारायणगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, सहाय्यक फौजदार भुजबळ, पोलीस शिपाई गोरक्ष हासे , पोलीस हवालदार पोपट मोहरे, पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी सापळा रचून नाशिक पुणे हायवे रोड वर नारायणगाव येथील इंडियन ऑयल पंपासमोर हायवेरोड वर एक संशइत महिंद्रा पीकअप गाडी ताब्यात घेऊन खात्री केली असता त्यामध्ये अंदाजे 1,80,000/- रुपये किमतीचे 900 किलो गोमांस मिळून आले असून सदर गोमांस व 3,00,000/- रुपये किमतीची महिंद्रा पीकअप गाडी जप्त करण्यात आली असून,

          सदर बाबत नारायनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नामे हलिम यूसुफ शेख, वय 49 वर्षे, रा.भारत नगर बोहरी मस्जिद रोड, ता. संगमनेर, जि.अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास मा.पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. रमेश चोपडे सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.रविंद्र चौधर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग व मा.अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हे करीत आहेत,

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!