Homepuneराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन निमित्त आळंदीत सलग दोन दिवस अन्नदान व...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन निमित्त आळंदीत सलग दोन दिवस अन्नदान व सरबत वाटप

आळंदी प्रतिनिधी
       श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे माऊलींचा वैष्णव मेळा भरलेला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त यावेळी सलग दोन दिवस कार्यक्रम राबवण्यात आला. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आरिफ भाई शेख यांनी वारकरी भाविकांसाठी अन्नदानाचा आणि दुसऱ्या दिवशी सरबत वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.       

 या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी डी डी भोसले,माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, भैरवनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला प्रतिनिधी रूपाली पानसरे.आळंदी शहर राष्ट्रवादी महिला माजी अध्यक्ष पुष्पाताई कुऱ्हाडे,राणी रंधवे

दमयंती कुऱ्हाडे संजय रंधवे सतीश बापू कुऱ्हाडे  आणि मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते माऊलींचे वारीला जाणाऱ्या भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. अन्न हे पूर्णब्रह्म याचीही प्रचिती अन्नदान कार्यक्रमात आली वारीला चालणाऱ्या वारकरी दिंडीमध्ये चालणारी भावीक यांना अन्नाची कदर असल्याचे जाणवले. तसेच दुसरे दिवशीही एक वेगळा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आला. यामध्ये थंडगार सरबत चे वाटप  उन्हाचा कडाका असल्याने करण्यात आले, एक हजार वारकरी भाविकांना या सरबतची वाटप करण्यात आल्याचे आयोजक व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आरिफ भाई शेख यांनी सांगितले आहे.माऊलींचा प्रसाद या भावनेने अन्नप्रसाद संपल्यानंतर एक एक घास तरी हातावर द्यावा यासाठी महिला अबाल वृद्ध आग्रही असल्याचे दिसून आले यावरून आळंदीवर आणि माउली वर त्यांची किती श्रद्धा आहे.हे दिसत होते. या कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी खजिनदार आरिफभाई शेख यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचा आळंदी शहरांमध्ये एकमेव हाच कार्यक्रम असल्याचे दिसून आले.
आळंदीतील हजेरी मारुती मंदिर चौकामध्ये या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते,
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!