Homeshirurआमदारांचा फोन : एका दिवसात विद्युत रोहित्र बदली

आमदारांचा फोन : एका दिवसात विद्युत रोहित्र बदली

सुनील भंडारे पाटील

      दरेकरवाडी (ता.शिरूर) येथील माळवस्ती मधील विद्युत रोहित्र (डी.पी) काही कारणामुळे अचानक बिघडली होती.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांवर संकट कोसळल्या सारखे झाले होते.
सदर घटनेची माहिती गावातील काही ग्रामस्थांनी आमदार अशोक बाप्पु पवार यांना कळवत मदतीची मागणी केली.तेव्हा आमदार  पवार यांनी त्वरित महावितरण चे कर्मचाऱ्यांना सदर समस्या सोडविण्यासाठी सांगितले. आणि कमालीची बाब म्हणजे एका दिवसात रोहित्र बदलून मिळाले,
         महावितरणचे संदीप दरवडे,बसवराज बिराजदार ,किशोर शिंदे  व राहुल गव्हाणे यांनी आमदार पवार यांचे आदेश मिळताच त्वरित दरेकरवाडी मध्ये जावून खराब झालेली विद्युत रोहित्र (डी.पी) काढून नवीन विद्युत रोहित्र रातोरात बसवून दिले.आमदार अशोक पवार यांच्या मदतीमुळे अवघ्या चोवीस तासाच्या आतमध्ये विद्युत प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.या वेळी दरेकर वाडीतील ग्रामस्थांनी आमदार अशोक बाप्पु पवार व महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!