याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर कैलास बाळासाहेब बांदल यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, शिक्रापूर मधील खैरे हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर मच्छिंद्र खैरे आणि त्यांच्या पत्नी सोनाली खैरे हे दोघे आज बुधवारी (ता 15) नगरच्या दिशेने जात असताना, पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर हद्दीतील साई सहारा पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गेल्यानंतर माघारी येताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकची कारला धडक बसल्याने हा अपघात झाला, अपघाताची तीव्रता एवढी जबर होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंबून आत मध्ये गेला, कारच्या डाव्या बाजूच्या सीटवर बसलेल्या डॉक्टर सोनाली खैरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉक्टर मच्छिंद्र खैरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,
याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात ट्रक नंबर MH 12 QG7447 चालक पवन भगवान साठे (वय 25 राहणार किनी, तालुका जळगाव,जिल्हा बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, डॉक्टर दांपत्याने आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून शिक्रापूर परिसरात चांगली ओळख तयार केली होती, या घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहेत,




