पुणे जिल्हास्तरीय ११ वा वर्धापन दिन व वैष्णव मेळावा राजूरी ता जुन्नर येथील खंडेराय भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट सभागृहात राजूरी व जुन्नर तालुका साहित्य परीषदेतर्फे आयोजीत करणेत आला . वृक्षारोपन व स्वागत गिता नंतर दिपप्रज्वलन, माऊली व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली . हभप गंगारामबुवा डुंबरे यांनी प्रास्ताविक तर विशाल महाराज हाडवळे व अनंतराव गटकळ यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला . यावेळी माजी आमदार शरद सोनवणे , माजी जि प सदस्य पांडूरंग पवार , मोहीतशेठ ढमाले, मा सभापती दिपक औटी बाळासो औटी , सरपंच प्रियाताई हाडवळे , उप सरपंच ज्ञानेश्वर शेळके , प्रशांत महाराज गावडे व वारकरी सांप्रदायातील महाराष्ट्रातील किर्तन प्रवचनकार व वारकरी उपस्थीत होते .
यावेळी प्रशांत महाराज मोरे , साहित्य परीषदेचे सचिव लक्ष्मण शेरकर , सहसचिव शामराव महाराज गायकवाड , माजी आमदार शरद सोनवणे व मान्यवरांचे हस्ते वारकरी व भजनी मंडळांचा स्मृती चिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करणेत आला .




