HomeUncategorizedपाटेठाण येथे अखंड ध्यानरूपी मौन नामसप्ताहाचे आयोजन - भजन ध्यान नामस्मरणाने मनशुद्धी...

पाटेठाण येथे अखंड ध्यानरूपी मौन नामसप्ताहाचे आयोजन – भजन ध्यान नामस्मरणाने मनशुद्धी होते -श्री सुमंतबापु हंबीर महाराज

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
         भजन गायन ध्यान्य नामस्मरणाने मन चित बुद्धी स्थिर एकाग्र होवून मनशुद्धी होते असे विचार सुमंतबापु हंबीर महाराजां नी पाटेठाण (तालुका दौंड) येथील प्रवचन सेवेत व्यक्त केले 

    परमपूज्य जगद्गुरु समर्थ श्री हंबीरबाबा यांचे बावन्नावे पुण्यस्मरण निमित्त अखंड नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सकाळी ८ ते ९ .३० योगासने व प्राणायाम, सकाळी ११ते १२प्रवचन , दुपारी १२ते १ , सायं ४ ते ५ व ५ ते ६ आणी रात्री ७ ते ८ अशा प्रवचन सेवांचे कालपासून दि . १० पर्यत आयोजन आहे . रोज उपस्थीत चारशेवर वारकऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था विश्वव्यापी मानवधर्म    आश्रम व पाटेठाण ग्रामस्थांतर्फे दात्यांच्या सौजन्याने करणेत आली आहे . नामसप्ताहाचे उद्घाटन कोरेगावचे माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे , दौंडचे माजी पं .स . सदस्य मानसिंग आबा शितोळे , शिरुरचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी जि . प . सदस्या वैशाली आबने यांनी केले . सप्ताहात हभप रमेश शिंदे ( करंजावणे ) झगडे महाराज ( धानोरे) रंगनाथ वाडेकर, बबनराव यादव , शिवाजी भालेकर   ( वडगाव बांडे) कैलासअण्णा हरगुडे ( सणसवाडी ) अनिल नाईक , रत्नाकर कुदळे , शिवाजी झेंडे (खामगाव ) शकुंतला आलेकरी (पुणे) हभप फलकेताई ( शिरुर ) भानुदास खळदकर , विठ्ठल आबा सातव , गजानन घोळे (पाटेठाण ) सुभाष पंडीत (खामगाव ) बबन जगताप , मोतीराम कुंभार (तळेगाव ढमढेरे) सोनबा शेलार (तळेगाव ) सिताराम दरेकर ( दरेकरवाडी ) जयश्रीबोरावणे , अमित शहाणे (पाटेठाण ) अमोल देशमाने ( पेठ वाळवा) दत्तात्रय तमनर ( राहूरी ) विजय मुळे ( देवीभोयरे ) अविनाश साळुंके (सादलगाव ) शंकर हंबीर , राजेंद्र हंबीर (पाटेठाण ) काळुराम कारंडे , नंदू खलसे( राहू ) कैलास सातव  ( वाघोली ) हभप चोरमले ( तिळापतिळापुर ) हभप काकडे ( वडगाव शिंदे ) निर्मलनाथ महाराज , निलेश लोंढे , स्वामी ज्ञान चैतन्य  ,  निघोट ( आळंदी ) सुरेश साठे ( नागरगाव ) तुकाराम फंड ( रांजणगाव ) ज्ञानेश्वर बर्डे ( चर्होली )  आदीं महाराजांची प्रवचनसेवा आयोजीत आहे . तरी भावीकांनी या अन्न व ज्ञानदान पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन नामसप्ताहाचे आयोजक व पाटेठाण ग्रामस्थांनी केले आहे .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!