HomeUncategorizedपिंपरखेड, लोणी धामणी,शिरदाळे भागात ढगफुटीमुळे नुकसानीचे पंचनामे करा -- खा. डॉ. अमोल...

पिंपरखेड, लोणी धामणी,शिरदाळे भागात ढगफुटीमुळे नुकसानीचे पंचनामे करा — खा. डॉ. अमोल कोल्हे

सुनील भंडारे पाटील 
 
      पिंपरखेड (ता शिरूर), लोणी धामणी, शिरसाळे ( ता आंबेगाव) आणि
परिसरातील गावांमध्ये वळवाच्या ढगफुटी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे
पंचनामे करावे, अशी मागणी आंबेगाव शिरूर मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल
कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे
केली आहे,       

संबंधित ठिकाणी शुक्रवार दिनांक
28 जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे
गावांमधील ओढ्यांना पूर आला, परिसरात असणाऱ्या दाभाडे मळा, भागडी रस्ता,
पारगाव रस्ता, मधला मळा, आंबेवाडी येथील
शेतातील बांध फुटून शेतीचे व
कांद्याच्या चाळींचे मोठे नुकसान झाले, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने
देखील नुकसान झाले, अशीच परिस्थिती आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी,
शिरदाळे येथे झाली आहे, या भागात वाटाणा, बटाटा,सोयाबीन, बाजरी, व इतर
पिकांचे खूपच नुकसान झाले आहे, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत
त्वरित पंचनामे करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून
द्यावी, व तसे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत  अशी मागणी लेखी
निवेदनाद्वारे खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना केली आहे,

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!